महत्वाच्या बातम्या

 श्री संकटमोचन हनुमान मंदिरात आजपासून अखंड रामायण पठणाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : भगवान श्री राम भक्त हनुमान यांच्या जयंतीनिमित्य श्री संकटमोचन हनुमान मंदिरात मंदिर समितीच्या वतीने श्री रामचरित मानसाच्या अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये पंडित चंद्रप्रसाद मिश्रा (बल्लारशाह बाबा) यांच्या करकमळ अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. 

विधीवत पूजेने सुरू होणारा हा रामायण पठण अखंड दोन दिवस चालणार असून त्यात अखंड ज्योत चोवीस तास प्रज्वलित राहणार आहे. सकाळी हवन आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व नागरिकांनी मंगळवारी श्री संकटमोचन हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या रामायण पठण व महाप्रसादात उपस्थित राहण्याची विनंती मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश निषाद, पुजारी शिवसंपत विश्वकर्मा, कार्याध्यक्ष मिथलेश विश्वकर्मा, उपाध्यक्ष देवेंद्र यादव, सचिव रवींद्र निषाद, संघटक रमेश गुप्ता, खजिनदार रामप्रकाश त्यागी, सहसचिव दिनेश कोकुलवार, कैलाश मोटघरे, सुधीर लिडाबे, दूधनाथ यादव, संतोष निषाद, विशाल श्रीवास, रामबाबू श्रीवास्तव, देवशरण यादव, गया पाल, हरिप्रसाद निषाद, इकबाल पाल, राजकुमार श्रीवास्तव, सिद्धार्थ रंगारी, केतन त्यागी, गिरिजाशंकर यादव, ऋतिक पाल, कार्तिक वर्मा, रामखिलावन केशकर, संपत वर्मा, राजाराम वर्मा, रमेश वर्मा, विनय विश्वकर्मा आदीने केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos