महत्वाच्या बातम्या

 कुशल कामाअभावी सुशिक्षित बेरोजगार वळले माती कामाकडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण भागात विस्तारला आहे. ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी नाहीत किंवा उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जातात.

यापासून उच्च शिक्षित तरुणसुद्धा सुटले नाहीत. कुशल कामाअभावी सुशिक्षित बेरोजगार माती कामावर असून बीए, बीकॉम तर कोणी बीएस्सी, टिकास, फावडे घेऊन दोस्ती रोहयोशी अशी स्थिती जिल्ह्यात दिसून येते.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच विविध कामे केली जातात. यामध्ये मजगी, तलाव, बोडी, शेततळे निर्मिती व रस्ता निर्मितीचा समावेश आहे. ही सर्व कामे अकुशल असल्याने योग्य दाम मिळत असल्यामुळे उच्च शिक्षित तरुणसुद्धा माती कामावर जातात. कामाच्या संधीचा फायदा घेतात. ग्रामीण भागात अधिकच रोजगाराच्या संधी नाहीत किंवा काम नसल्याने अनेक जण रोहयोची कामे सुरू होताच कामावर हजर होतात. त्यामुळे कुटुंबालाही आर्थिक मदत होते.





  Print






News - Bhandara




Related Photos