महत्वाच्या बातम्या

 मुन्नुर कापेवार बेलदार व राजघराण्याचे संबंध तीन पिढ्या पासूनचे : ना. धर्मरावबाबा आत्राम


- समाज मेळावा साठी अहेरी व सिरोंचा तालुक्याचे समाज बांधव उपस्थित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : मुन्नूर कापेवार बेलदार या जातीचे संबंध राजघराणे सोबत मागील तीन पिढ्यापासून आहे. ज्यामुळे संबंधात गोडवा व विश्वास हा अतूट आहे. राजकारणातील प्रारंभिक दिवसापासून आतापर्यंत या समाजाने सहकार्य केले. त्यामुळेच मागील तीस वर्षापासून सक्रिय राजकारणात मोठे पद भूषवल्यानंतर या समाजाला पाहिजे ती मदत करत आलो आहे आणि भविष्यात हि करीत राहणार, असे प्रतिपादन उदघाटनिय भाषणात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील गडअहेरी रोड वरील शंकरराव बेझलवार सभागृह समोर झालेल्या ५० लक्ष निधीतून बनविण्यात येणाऱ्या कन्नमवार भवन च्या भूमिपूजन कार्यक्रमसाठी आयोजीत कार्यक्रमात कार्यक्रमांचे अध्यक्षा गडचिरोली जिल्हा परीषद चे माजी अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्या भाग्यश्री आत्राम हे होते तर प्रमूख अतिथी गडचिरोली जिल्हा नियोजन समिती चे सदस्य ऋतुराज हलगेकर, युवा बेलदार समाजाचे प्रांतीय राजेश कात्रटवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पोचम उपलपवार, गडचिरोली नगर परिषद चे उप कार्यकारी अधिकारी रवींद्र भंडारी, सामजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार अहेरी नगरपंचायत चे पहिली नगराध्यक्षा प्राजक्ता पेदपल्लीवार मंचावर उपस्थित होते. 

मला जिल्ह्यातील प्रथम नागरिक बनविण्यासाठी मुन्नूर कापेवार बेलदार समाज अधिकतेने असलेले जिल्हा परीषद निवडणूक क्षेत्र मधूनच जिंकून जाव लागले. त्यामुळेच जील्हा परीषद गडचिरोलीचे सर्वोच्य पद मिळविता आले. म्हणूनच माझ्या राजकीय जीवनात या समाजातील महिला, तरुणी, तरुण व सर्वच नागरिक मला सहकार्य करणारे च आहेत, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात भाग्यश्री आत्राम म्हणाल्या. 

कार्यक्रमात शिक्षण पुर्ण करून आदर्श ठरलेल्या तरुण पिढी चे सत्कार करण्यात आले. ज्यात डॉ. निखिल चीलकमारी, डॉ. शिवानी अन्नलदेवार व डॉ. व्यंकटेश कोलावार यांचे करण्यात आले. सोबतच सेवानिवृत्ती पर पोलीस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार, सुनील बेझलवार, अभियंता राजू घसगंटीवार यांचा पण सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूण मुक्कवार, संचालन महेश मुक्कावार तर आभाप्रदर्शन विवेक बेझलवार यांनी केले.

मेळाव्यात समाजाच्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन या समाज मेळावामध्ये चंद्रपूर जिल्हा मधील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन समाजाला मिळाले चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अवधूत कोट्टेवार, वरोरा अध्यक्ष राजु फेथफुलवार, चंद्रपूर चे सहसचिव शंकरराव डांगेवार, चंद्रपूर शहराध्यक्ष विजय बोरगमवार कोषाध्यक्ष योगेश पेंटीवार ह्यांनी समाज एकत्रीत व संघटन मजबूत करण्यासाठी काय करावे. आणि कोणत्या बाबी समाजाला अतिशय उपयुक्त ठरतात याचे मार्गदर्शन केले. सोबतच समाज एकत्रित राहाल तरच समाजाच्या विवीध मागण्यासाठी आपण सत्ताधाऱ्यांना पुर्ण करण्यास दबाव टाकु शकतो असे सांगितले.

लोकगीत गायकांनी वेळेवर गीत तयार करून केली बाबा व ताईची कार्याची स्तुती -

मुन्नूर कापेवार बेलदार समाजासाठी लोकगीत गाणारी गोदावरी कणी गावातली मंडळी समाज मेळाव्याला आली होती. ते नेहमी तेलंगाना आंध्र प्रदेश व महाराष्ट्र च्या सीमेवर विशिष्ट तेलगू भाषिक पट्यात अनेक प्रकारचे लोकगीते गाऊन समाजाला प्रोत्साहन आणि चेतना मिळवून देतात आणि समाज जागृती गीत गात  करीत असतात. अशाच प्रकारचे लोकगीत समाज मेळावा गायन करण्यासाठी आले. आणि त्यांची विशेषता म्हणजे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर अगदी काही क्षणातच गीत तयार करून त्यांनी समाजाप्रती मागील ३० वर्षापासून केलेला कामांचा उल्लेख गीतांमध्ये करीत त्यांचा कार्याचा गौरव प्रभावीपणें लोकांसमोर केला सोबतच भाग्यश्री आत्राम यांचाही त्या गीतात उल्लेख केला. वेळेवर तयार केलेला गीत लोकात खूप आवडला गेला. त्यामुळे त्यांची सर्व उपस्थित समाज बांधवांतर्फे वाहवाही करण्यात आली.

  Print


News - Gadchiroli
Related Photos