महत्वाच्या बातम्या

 राम जन्मोत्सव निमित्त कारसेवकांचा जाहीर सत्कार


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : १७ एप्रिल २०२४ रोजी रामजन्म उत्सवा नीमित्य कार्यक्रमात हनुमान मंदिर आठवडी बाजार गडचिरोली येथे कार सेवकांचा अती उत्साहात जाहीर सत्कार करण्यात आला. भगवान श्री रामाचे मंदिर अयोध्या येथे साकार झाले, हे कार्य ज्यांच्या त्यागामुळे संपन्न झाले अश्या गडचिरोली येथून जाणाऱ्या कार सेवकांचा शाल, पुष्पगुच्छ व श्री रामा चा फोटो देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. 

यामध्ये प्रामुख्याने विजय शेंडे, यमराज बारसागडे, बाबुराव जुवारे, रमेश कोतपल्लिवार, अशोक सुर्यवंशी, वसंत कडूकर, बबन सूर्यवंशी, सुशील सुर्यवंशी ई.चे सत्कार करण्यात आले. 

दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी १२.३० वाजता गोपालकाला व प्रसाद वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षाचे  खासदार साठीचे उमेदवार अशोक नेते व डॉ. किरसान यांनी भेट दिली. गडचिरोलीचे आमदार डॉ. होळी यांनी सुद्धा भेट दिली व दर्शन घेतले.

सायंकाळी भगवान श्री राम यांची गडचिरोली शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी कार सेवकांनी आपले अनुभव कथन केले.

या प्रसंगी वि ही प जिल्हा महामंत्री शंकर बोरकर, जिल्हा महामंत्री रमेश बोदलकर, सुशील हिंगे यांनी यथोचित मार्गदर्शन केले. प्रखंड मंत्री अनुप असाटी, प्रखंड संयोजक बालाजी भांडेकर, सहसंयोजक सुयोग गुरूनुले, सुरेश भांडेकर अँटीकरपशन ब्युरो सेक्रेटरी, माजी नगर सेवक मुक्तेश्वर काटवे पद्माकर पीपरे, महेश भांडेकर, भारत भांडेकर, पवन भांडेकर, गणेश जूवारे, कैलाश भांडेकर, मनोहर भांडेकर, उमाजी बारसागडे, सुरेश नैताम, गोसाई पिपरे, महादेव बोबाटे, प्रकाश भुरले, कुणाल भांडेकर इत्यादी लोकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले. मंदिराचे अध्यक्ष मनोहर भांडेकर यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos