सावली येथील ए. टी.एम. दोनदा फोडण्याचा प्रयत्न, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ साखरी (सावली) : 
सावली येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.  याप्रकरणी सावली पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.  सुशिल दादाजी कुडवे रा. सावली ,  अमोल बंडू भडके रा मूल व अन्य दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. तर एक आरोपी फरार आहे. 
बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी   दिपक मधुकर नामेवर  (३७) रा घाटकुळा चंद्रपुर,ता जि.चंद्रपुर,यांनी  सावली येथील महाराष्ट्र बँकेचे ए टी एम  १४ ऑगस्ट व १८ ऑगस्ट च्या रात्री    फोडण्याचा प्रयत्न केल्याबाबत तक्रार दाखल केली. तोंडी रिपोर्टवरुन अप.क्र.३३९/२०१९ कलम ४५७,३८०,५११,३४ भांदवि गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी   पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे  यांच्या नेतृत्वात डी बी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी  ताबडतोब बँकेचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त करून फुटेजमध्ये संशयास्पद दिसत असलेला आरोपी सुशिल दादाजी कुडवे रा सावली यास ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता आरोपीने इतर आरोपींचे नावे सांगण्यास सुरुवात केली. अमोल बंडू भडके रा मूल व सावली येथीलच दोन अल्पवयीन  अशा चार जणांना ताब्यात घेतले.  सदर कारवाई पो.नि.बाळासाहेब खाडे  यांच्या नेतृत्वात  पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदिरवाडे, पोलीस हवालदार  केवलराम उइके, पोलीस शिपाई  सुमित मेश्राम,  प्रफुल आडे,  नरेश डाहुले,  दिपक डोंगरे यांनी केली.  पुढील तपास पो नि बाळासाहेब खाडे  यांच्या मार्गदर्शनात सावली पोलीस करीत आहेत.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-20


Related Photos