उद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय , शहरीकरण या सात मुद्द्यांवर भर देणारा आघाडीचा 'शपथनामा' जाहीर


वृत्तसंस्था /  मुंबई : उद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या सात  मुद्द्यांवर भर देत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन 'शपथनामा' जाहीर केला आहे.  
युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा या शपथनाम्यात अंतर्भाव करत बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासनही काँग्रेस आघाडीने दिले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीरनामा सादर केला.  खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, एकनाथ गायकवाड असे प्रमुख नेते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

आघाडीच्या  शपथनाम्यातील मुद्दे 

- नव्या उद्योगातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना देण्यासाठी विशेष कायदा करणार
- कामगारांचे किमान वेतन २१ हजार रूपये करणार
- औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवणार
- मानव विकास निर्देशांक उंचावण्यावर भर देणार
- ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान देणार
- ‘मराठी भाषा सल्लागार समिती’च्या शिफारशीनुसार मराठी ही ज्ञानभाषा बनवण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार
- सर्व महापालिकांच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत घर असलेल्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करणार
- राज्यातील प्रत्येक नागरिक विम्याच्या कक्षेत आणणार
- केजी टू पीजी मोफत शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी पहिल्या टप्यात शासकीय आणि अनुदानीत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणार
- तरूण, सुशिक्षित बेरोजगारांना मासिक पाच हजार रुपये भत्ता देणार
- शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणार  Print


News - Rajy | Posted : 2019-10-07


Related Photos