महत्वाच्या बातम्या

 कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मलरेड्डी येमनूरवार यांचा वाढदिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : सामाजिक कार्यकर्ते तथा नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य मलरेड्डी येमनूरवार यांचा वाढदिवस राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

मलरेड्डी येमनूरवार यांचा आज १८ एप्रिल रोजी ५५ वा वाढदिवस होता. अगदी सकाळीच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिले. निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना देखील त्यांनी वेळात वेळ काढून नागेपल्ली येथील त्यांच्या घरी पोहोचले आणि प्रत्यक्ष शुभेच्छा दिले.

यावेळी घरच्या मंडळींनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत केक कापून ५५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान मंत्री आत्राम यांचे आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील कार्यकर्ते व घरचे मंडळी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos