महत्वाच्या बातम्या

 वासेरा-जामसाळा जामलामाता देवस्थान परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा-जामसाळा जामलामाता देवस्थान परिसरात आज ४ वाजता मोठ्या पट्टेदार वाघ चावरे यांच्या शेतात तुळीच्या झाडामध्ये लपुन बसला होता. त्याच शेतामध्ये महीलांकडुन धान कापनी सुरु होती. वाघाच्या डरकाडीने महिलांना चाहुल लागताच सर्वांनी शेताबाहेर येवुन वासेरा जामसाळा या डांबरी रस्त्याकडे पळ काढला. ही वार्ता वार्यासारखी जामसाळा व वासेरा या गावात येवुन धडकली. दोन्ही गावातील लोकांची गर्दी जमा झाली.

याची माहिती त्वरीत वनविभागाला देण्यात आली. लगेचच वनविभागाची रेस्क्यु टीम व पिआरटीची टीम त्या शेताच्या सभोवताल झाले. फटाके फोडत हाकलुन लावण्याचा प्रयत्न सुरु झाला. जामसाळा वासेरा व नविन जामसाळा येथील लोकांनी तिन्ही बाजुने त्या शेताला घेरत समोर येवु लागताच वाघाने डरकाडी मारीत जंगलाच्या दिशेने पळ काढला व जंगलातील वेळुच्या रांजीत गळप झाला.

वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या मागावर गेले असुन त्याचे पगमार्क घेतांना दिसले असून दिवसाढवळ्या अशा वाघाच्या दर्शनाने धान कापणीवर भीतीचे संकट ओढवले आहे. याच वाघाने काल नविन जामसाळा येथील दिलीप नन्नावरे यांची शेळी फस्त केली. सदर तिन्ही गावातील जनतेंनी या वाघाचा बंदोबस्त करुन दुसरीकडे हलविण्याची मागणी केली आहे. वनपरीक्षेत्र शिवणी येथील अधिकारी भाऊराव तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी अनुचित घटना घडु नये म्हणुन या परिसरात ठाण मांडून बसले आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos