महत्वाच्या बातम्या

 आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा असून ही निसर्गनिर्मित असून आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुहा आहे.

तसेच या गुहेत जवळपास ५ हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात, इतकी जागा या गुहेत उपलब्ध आहे असे सांगितले जाते.

ही गुहा म्हणजे आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धास्थान असून या गुहेत आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत म्हणजे पारी कोपार लिंगो ची मूर्ती आहे. मागील ४० वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरत आहे. महाराष्ट्रासह इतर १८ राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदेवतेची पूजा व दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात. अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा ५ दिवस चालत असते. कचारगडच्या गुहेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते.





  Print






News - Gondia




Related Photos