आजचे दिनविशेष
१५ एप्रिल महत्वाच्या घटना
१६७३ : मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
१८९२ : जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१९१२ : आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
१९२३ : मधुमेह असणाऱ्यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
१९४० : दुसरे महयुद्ध- नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१९९७ : मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९९४ : भारताची इंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी झाली
१५ एप्रिल जन्म
१४५२ : इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १५१९)
१४६९ : शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)
१७०७ : स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)
१७४१ : चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)
१८९३ : चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)
१८९४ : सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)
१९०१ : अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.
१९१२ : उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १९९७)
१९१२ : उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९९४)
१९२२ : गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)
१९३२ : कवी सुरेश भट यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च २००३)
१९६३ : भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.
१५ एप्रिल मृत्यू
१७९४ : पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.
१८६५ : अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१९१२ : आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १८५०)
१९८० : फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून १९०५)
१९९० : हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)
१९९५ : तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.
१९९८ : कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)
२०१३ : संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)
News - todayspecialdays