देवळीतील विविध मंदिरात स्वच्छता अभियान : खासदार रामदास तडस यांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभर उत्साहाचे वातावरण आहे. श्री राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे लोकपीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आहे. या सोहळ्याच्या आधी देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा राम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवितांना केली. त्या अनुषंगाने खासदार रामदास तडस यांनी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून देवळीत स्वछता सप्ताह साजरा केला जात आहे.
यावेळी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात कार्याचा शुभारंभ करून देवळीतील वेगवेगळ्या पाच मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या आठवड्यात टप्प्याटप्याने स्वच्छता मोहीम राबवून धार्मिक कार्यात योगदान देण्याचे नियोजन करण्यात आले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात देवळीतील श्री संत मिरणनाथ महाराज मंदिर, संत गजानन महाराज मंदिर तसेच यवतमाळ रोड हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर व साईबाबा मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मंदिराच्या गाभा-याचा भाग स्वच्छ पाण्याने धुवून काढण्यात आला.
शिवाय हातात झाडू घेऊन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रा. नरेंद्र मदनकर, किशोर फुटाणे, शरद आदमने, प्रकाश कारोटकर, मारोती मरघाडे, विजय गोमासे, दशरथ भुजाडे, सारिका लाकडे, माया वडेकर, सारंगा मडावी, उमेश कामडी, किसना उगेमुगे, दिवाकर झाडे, हर्षल कैकाडी, संजय सहारे, नारायण सुरकार, रमेश सातपुते, नाना दुरगुडे तसेच मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
News - Wardha