महत्वाच्या बातम्या

 पेरमिली ग्रामपंचायत अंतर्गत गावांत विकास कामांचे भूमिपूजन


- माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या पुढाकाराने मिळाली निधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील पेरमिली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावांत माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या पुढाकाराने लाखो रुपयांची निधी मिळाली असून नुकतेच यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

पेरमिली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गावांत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी येथील कार्यकर्त्यांनी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडे केली होती. गावात आवश्य असलेल्या विकास कामांची यादी तयार करून या कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी भाग्यश्री आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी केली. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी खेड्या गावांचा विकासासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिली.

या ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट चंद्रा, चंद्रा टोला, आलदंडी आणि पेरमिली आदी गावकऱ्यांच्या मागणीनुसार चंद्रा येथे सभा मंडप, आलदंडी येथे सिमेंट रस्ता, पेरमिली येथे सभा मंडप आणि सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. गावातील विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

या कामांना तांत्रिक मान्यता मिळताच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, सत्यनारायण येगोलपवार, बालाजी गावडे, पाटील संजय सडमेक, ताजु कुळमेथे, मासा तलांडी, दसरू आत्राम, अमर गावडे, सुमन मेश्राम, प्रतिमा गावडे, किरण गावडे, नवलेश आत्राम, तारा आत्राम, बंडू दहागावकर, सुरेखा सडमेक, चिला कुमरे, मीरा अतकुलवार आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos