महत्वाच्या बातम्या

 मतदार जनजागृतीसाठी न्यू इंग्लिश स्कूल येथे मानवी रांगोळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, याउद्देशाने वर्धा येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मानवी रांगोळी काढून मतदार जनजागृती करण्यात आली.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात स्वीपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. युवा पिढी देशाचे भवितव्य असून त्यांना शालेय जीवनापासूनच मतदान प्रक्रियेविषयी माहिती व्हावी तसेच इतर मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी वर्धा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या ५, ६ आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी काढून जनजागृती केली. ही मानवी रांगोळी काढण्यासाठी २५५ मुले व २७५ मुलींनी सहभाग घेतला.

न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनघा आगवान, उपमुख्याध्यापक विजय जुगनाके, शिक्षक इंदर ढोले, प्रशांत लिडबे, रहीम शहा, नम्रता बैस यांच्यासह इतर शिक्षकांनी या उपक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.





  Print






News - Wardha




Related Photos