देसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
वैयक्तीक वादातून देसाईगंज शहरात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. एजाज नवाज खाँ पठाण (२७) रा.जुनी वडसा देसाईगंज असे जखमीचे नाव असून त्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी समीर कुरेशी याला देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. 
३  सप्टेंबर रोजी  सकाळी ११:३०  वाजता  काही क्षुल्लक कारणावरून वाद पेटला व दोन इसमांनी पठाण यांच्या वर हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सैफ कुरेशी व समीर कुरेशी यांचावर कलम ३२६,३४ भा. दं. वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर कुरेशी याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले व आज ५ सप्टेंबर ला समीर कुरेशी याला न्यायालयात हजर करण्यात आले व १५ हजाराच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. आरोपिकडून  अधिवक्ता मंगेश शेंडे यांनी बाजू मांडली.  दुसऱ्या आरोपीचा शोध देसाईगंज पोलीस घेत आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-05


Related Photos