महत्वाच्या बातम्या

 हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील वडकी चेकनाका येथे खर्च निरीक्षकांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. ०८ वर्धा लोकसभा मतदार संघ अंतर्गत ४६- हिंगणवाट विधानसभा मतदार संघा मध्ये आचार संहिता लागू झालेली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक खर्च निरीक्षक के.जी. अरुणराज यांनी हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील वडकी चेकनाका येथे भेट दिली व चेकनाक्यावरील नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाहन तपासणीबाबत सूचना दिल्या.

हिंगणघाटच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, उपविभागीय पोलीस अधिकारी आर. बी. पंडीत, तहसीलदार सतिश मासाळ, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी सुरज बारापत्रे, कृषी विकास अधिकारी तथा संपर्क अधिकारी संजय बमनोटे, वडणेरचे पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वर्धा लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या वर्धा, देवळी व हिंगणघाट या विधानसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक म्हणून के. जी. अरुणराज  यांना जबाबदारी देण्यात आली आहे. हिंगणघाट मतदारसंघामध्ये ६ भरारी पथके, ४ एस एस टी पथके, ५ व्हीएसटी पथके याप्रमाणे विविध पथकांची स्थापना करण्यात आली, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तद्नंतर हिंगणघाट येथे भेट देऊन निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने सर्व अधिकारी तसेच पथकांचा आढावा घेण्यात आला.





  Print






News - Wardha




Related Photos