सूक्ष्म सिंचना खाली ९ लाख हेक्टर क्षेत्र, ११ लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत


- नोंदणी ते अनुदान ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: सूक्ष्म सिंचन योजनेच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीमुळे राज्यात ९  लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. या योजनेचा मागील पाच वर्षात ११  लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला असून त्यांचे आर्थिकस्तर उंचावण्यास मदत झाली आहे.
 सूक्ष्म सिंचन योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा सहभाग त्यात वाढावा यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करताना सोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांची संख्या २४  वरुन ९  वर करण्यात आली. शेतकऱ्यांना सुलभ लाभ मिळत असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
 शेतकऱ्यांना  डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कृषी विभाग पुढाकार घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या योजनेकरीता अर्ज स्वीकृतीसाठी ‘ई-ठिबक’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली आहे. ‘नोंदणी ते अनुदान’ वितरणाची संपूर्ण कार्यवाही संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे. या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभार्थी शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. त्यामुळेच योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आली आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
 या योजनेच्या पूर्व संमतीचा ३०  दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील नव्याने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  २०१४   पासून सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संचांची उभारणी केल्याने सुमारे ११  लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. 

 




  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-08-08






Related Photos