हिंगण्यातील एका प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थिनीवर अत्याचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
हिंगण्यातील एका प्रशिक्षण केंद्रात फेब्रिकेशनचे प्रशिक्षण  घेत असलेल्या  २३ वर्षीय विद्यार्थिनीवर २५ वर्षीय वॉर्डनने अत्याचार केल्याची घटना   उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी पंकज लीलाधर वडस्कर  रा. वाघधरा याच्या विरुद्ध अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.  आरोपी  फरार आहे.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत चंद्रपूर येथील २३ वर्षीय विद्यार्थिनी हिंगण्यातील एका प्रशिक्षण केंद्रात फेब्रिकेशनचे प्रशिक्षण घेण्यासाठी आली. ती वसतिगृहात राहात होती. २६ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास पंकजने विद्यार्थिनीच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘डोके दुखत आहे. बाम घेऊन दुसऱ्या माळ्यावरील खोलीत ये’, असे तो विद्यार्थिनीला म्हणाला. विद्यार्थिनी बाम घेऊन खोलीत गेली. यावेळी पंकजने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ‘याबाबत कोणाला सांगितल्यास वसतिगृहातून काढून प्रशिक्षण पूर्ण होऊ देणार नाही’, अशी धमकी त्याने विद्यार्थिनीला दिली. घटननेनंतर विद्यार्थिनी दहशतीत होती. तीन दिवसांपूर्वी तिने हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल धानोरकर यांनी पंकजविरुद्ध अत्याचार व ॲट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल केला. 
  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-30


Related Photos