राज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०१९  मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे, असे आयोगाचे उपसचिव सुनील अवताडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
 सन २०१९  मध्ये आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१८ , राज्य सेवा २०१९ , महाराष्ट्र दुय्यम  सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पोलिस उपनिरीक्षक, न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग, सहायक मोटार वाहन निरीक्षक, कृषी सेवा, वन सेवा, महाराष्‌ट्र गट –क  सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ , महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, राज्य कर निरीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब यासह इतरही  विभागाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अधिक आणि संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-11-13


Related Photos