महत्वाच्या बातम्या

 धर्मदाय रुग्णालयातील १० टक्के खाटा राहणार गरीब व गरजू रुग्णांसाठी आरक्षित


- आरक्षित खाट पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समीतीवर आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर गरजु रुग्णांवर उपचार करण्यासाठी धर्मदाय रुग्णालयात १० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आरक्षित खाट निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समीतीवर आमदार किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार होण्यासाठी योजना तयार करण्यात आली असून त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्वीत खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयासह धर्मादाय रुग्णालयातही गरजू रुग्णांवर निशुल्क उपचार होणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos