हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप, ५ हजारांचा दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
शेतीच्या वादातून हत्या केल्याप्रकरणी आरोपीस प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांनी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. 
नामदेव राजन्ना संगावार रा. किष्टापूर टोली ता. चामोर्शी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २४ ऑक्टोबर २०१५ रोजी फिर्यादी रमेश नामदेव पुरमवार रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृतक नामदेव पोचन्ना पुरमवार हे २३ ऑक्टोबर  २०१५ रोजी किष्टापूर येथील स्वतःची शेती पाहण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी नामदेव संगावार हा शेतात धान कापत होता. मृतक नामदेव पुरमवार यांनी आरोपीस माझ्या शेतातील धान का कापत आहेस, अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर २४ ऑक्टोबर रोजी मृतक नामदेव पुरमवार हे स्वगाी जाण्यासाठी अड्याळ येथील बसस्थानकावर थांबले होते. यावेळी आरोपी नामदेव संगावार हा तिथे पोहचला. त्याने नामदेव पुरमवार यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे नामदेव पुरमवार यांचा मृत्यू झाला.
घटनेची आष्टी पोलिस ठाण्यात नोंद करून कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास तपासी अधिकारी उमेश बेसरकर यांनी पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपप. दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांनी साक्ष पुरावे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून व सहाय्यक सरकारी वकील सचिन यु. कुंभारे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आज ११ ऑक्टोबर  रोजी आरोपी नामदेव राजन्ना संगावार याला कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांनी काम बघितले.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-11


Related Photos