महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते कारमपल्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट कारमपल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

भामरागड हा आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख आहे. या तालुक्यातील विविध गावांचा विकास करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिली असून या निधीतून गावांचा कायापालट होणार आहे. येथील नागरिकांच्या मागणीनुसार गावात विकास कामे मंजूर करण्यात आले असून नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

कारमपल्ली येथील विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी ट्रॉली काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे, घिसू वाचामी, चिना वाचामी, मनसु मट्टामी, राम मडावी, सदू वाचामी, मंगु वाचामी, रवी वाचामी, जगदीश धुर्वा, शंकर मट्टामी, छाया मट्टामी, रमी वाचामी आदी उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos