राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका


-पंचायत समिती सदस्य जनार्धन नल्लावार यांच्या प्रयत्नाला यश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी
/ एटापल्ली : पंचायत समिती सदस्य जनार्धन नल्लावार यांनी आदिवासी विकास व वनराज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. आत्राम यांच्याकडे शव-वाहिकेची मागणी लावून धरल्यामुळे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आमदार निधीतुन शव-वाहिका एटापल्ली तालुक्याला उपलब्ध करून दिली .
एटापल्ली तालुका हा अतिदुर्गम भाग असुन १९७ गाव एटापल्ली तालुक्यात आहेत .येथील ग्रामीण रुग्णालयात एक शव-वाहिका देण्यात यावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य जनार्धन नल्लावार यांनी केली होती. ना.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन शव-वाहिका एटापल्ली तालुक्याला उपलब्ध करून दिली .काही दिवसात या शव-वाहिका चे  ना.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती जनार्धन नल्लावार यांनी दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-21


Related Photos