महत्वाच्या बातम्या

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत प्रशिक्षण योजना सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालया अंतर्गत असलेल्या जिल्हा कार्यालय नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीमार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी; त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी समाजातील गरजूंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्याकरीता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

प्रादेशिक कार्यालय नागपूर अंतर्गत असलेल्या विविध जिल्हा कार्यालयास एकूण १ हजार १३३ प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झालेले आहे. योजना राबविण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध संस्थांचे प्रस्ताव १० मार्चपर्यंत व प्रशिक्षणार्थ्यांचे अर्ज १५ मार्चपर्यंत प्रादेशिक कार्यालय, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, रुम नं. ३०२, बी. विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, साऊथ अंबाझरी रोड, नागपूर ४४००२२ येथे सादर करावे.

योजना राबविण्यासाठी लाभार्थी, प्रशिक्षण संस्था यांच्या पात्रता, अटी, शर्ती, निकष पुढीलप्रमाणे आहेत. मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा. महाराष्ट्रातील रहिवासी असावा. वय १८ ते ५० वर्ष असावे. अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा जासत नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे करण्यात येईल. तसेच शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कोर्सेसची निवड प्रशिक्षणार्थीने करणे बंधनकारक राहील.





  Print






News - Nagpur




Related Photos