इंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
तालुक्यातील इंदाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा कुलूप तोडून एल.इडी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री लंपास केली . सदर घटना २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . 
शाळेतील पहिल्या वर्गाचा कुलूप तोडून विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आधार असलेले एल.इडी टीव्ही व संच अज्ञात चोरट्यांनी सोमवारच्या मध्यरात्री उडविले. हि बाब दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस येताच मुख्याध्यापकानी पोलीस पाटील , तंमुस अध्यक्ष , सरपंच , व शाळा व्यवस्थापन समितीच्या लक्षात आणून दिली . याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली आहे . पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत . 
   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-21


Related Photos