महत्वाच्या बातम्या

 आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते कोट्यावधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन


- कृष्णनगर येथे सी.सी. रस्ता १.८० कोटी, जयनगर, विक्रमपूर येथे २५ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

- गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदारांची ग्वाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी आपण कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून यापुढेही कोणत्याही गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्र्वासन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी कृष्णनगर येथील १.८० कोटी रूपयांच्या सी.सी. रस्ता व जयनगर, विक्रमपूर येथील २५ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करताना केले.

यावेळी बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शाह, भाजपा  जिल्हा सचिव दिलीप चलाख, उपसरपंच प्रभास सरकार, पवन रामगीरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा धनंजय माझी, बादल डे विक्रम बेपारी अजय मंडल, प्रदिप मंडल, हरेन्द्र सरकार, प्रताप ढाली, हिरामती गाईन, मंजु मिस्त्री, बंटी राय, जगन्नाथ मल्लीक, मुकेश माझी, कुमारेश मिस्त्री, अनिकेत डे शशी गाईन, चंदन मंडल, मोहीत मल्लीक, आयुष्य राय यांचे सह गावकरी उपस्थीत होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos