महत्वाच्या बातम्या

 दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालयाच्या विकलांग व्यक्ती सबळीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांकडून शालांतपुर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी www.scholarship.gov.in या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज स्विकारण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे. दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल प्रणाली कार्यान्वित आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनवरून मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज विहीत वेळेत तपासून जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाच्या लॉगीनवर ३१ डिसेंबर पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. विहीत मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास किंवा विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहिल. मुदतीत अर्ज लॉगीनवर सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०७१५२-२४२७८३ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos