महत्वाच्या बातम्या

 गोंदिया शहरवासीयांना आमदार विनोद अग्रवाल यांची अनोखी भेट


- आता होणार महानगर पालिकेसारखे रस्ते आपल्या गोंदियात 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे रस्त्यांच्या समस्या नागरिकांना भेडसावत होत्या यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल मागील अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत. 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजने अंतर्गत गोंदिया शहरातील विविध रस्त्यांना मंजुरी मिळाली असून आता नागपूर शहरासारखे रस्ते गोंदिया शहरात सुद्धा बघावयास मिळणार आहेत. महानगर पालिका स्तरावरी रस्ते आपल्या गोंदिया नगर परिषद क्षेत्रात निर्माण होणार असल्याने भविष्यात वाढत्या वर्दळीचा विचार करता पुढील २०-२५ वर्षे या रस्त्यावर खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही. 

या योजनेअंतर्गत गोंदिया शहरातील रस्त्यांसाठी ६५.७४ कोटी रुपयांची निधी मजूर झाली असून आमदार विनोद अग्रवाल यांनी सुचविलेल्या ९ ठिकाणी रस्ते व बंदिस्त गटार आणि एका पुलाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. 

यामध्ये मोदी पेट्रोल पंप ते आदर्श सिंदी स्कूल पर्यंत रस्ता आणि गटार, यादव चौक ते पाल चौक पर्यंतचा रस्ता आणि गटार, रेस्ट हाऊस ते पाल चौक मार्ग कुडवा नाका पर्यंत रस्ता आणि गटार, मनोहर चौक ते छोटा गोंदिया मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय बायपास रस्ता, गांधी प्रतिमा ते जयस्तंभ चौक मार्ग, अजय मेडिकल गणेश नगर ते सेल्स टॅक्स कॉलोनी रस्ता आणि गटार, राणी अवंतीबाई चौक ते कटंगी रेल्वे क्रॉसिंग रस्ता आणि गटार, सिंगल टोली ते आंबेडकर चौक मार्ग, आईएमए हॉल ते तिरुपती नगर मार्ग पिंडकेपार रस्ता इत्यादी रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. पिंडके पार कडे जाणाऱ्या मार्गामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कडे येणाऱ्या जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निर्माण होणार असल्याने भविष्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कडे येणाऱ्या जड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी सुद्धा मार्गी लावण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व रस्त्यांची गुणवत्ता पुढील २०-२५ वर्षात होणाऱ्या वाहतुकीत वाढीचा अंदाज घेवून केले असल्याने भविष्यात परत रस्त्यावर होणारा अधिकचा खर्च टाळता येणार आहे. 

या कामांना नगरपरिषद गोंदिया यांच्या माध्यमाने पूर्ण केले जाणार आहे. भविष्याचा विचार करून या रस्त्यांची गुणवत्ता वाढ करणे आवश्यक असल्याने पहिल्या टप्प्यात या रस्त्यांची कामे पूर्ण केले जाणार असून पुढील टप्प्यात शहरातील इतर मार्ग सुद्धा बांधकाम केले जाणार आहेत. गुणवत्तापूर्ण रस्ते उपलब्ध करून देणे हाच आपला धोरण असून पुढील टप्प्यात गोंदिया शहरातील इतर मार्ग सुद्धा आता गुणवत्ता पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.





  Print






News - Gondia




Related Photos