राज्याच्या भरती पनोकरभरतीसाठी आता या कंपन्या, भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा : मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब रीक्षांमध्ये आता होणार नाहीत घोटाळे : शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या वर्षभरात राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि म्हाडाच्या परीक्षा घेण्यात आल्या मात्र यादोन्ही परीक्षांमध्ये प्रचंड घोटाळे आणि गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी पेपर लीक झाल्याच्या घटनाही घडल्या. यामुळे तत्कालीन सरकारला त्या परिक्षा ऐन वेळेवर रद्द करावा लागल्या होत्या. मात्र आता अशा प्रकारचे भरतीतील घेतले पुन्हा होऊ नये म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या भरती परीक्षांमध्ये आतापर्यंत परीक्षा या त्या त्या विभागामार्फत किंवा एमपीएससी मार्फत घेण्यात येत होत्या. मात्र आता राज्यातील सर्व भरती परीक्षा या टीसीएस- आयओएन किंवा आयबीपीएस या संस्थांमार्फत घेण्यात येणार आहे. या दोन्ही संस्था केंद्र सरकारच्या भरती परीक्षा घेतात त्यामुळे या संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये घोटाळे होण्याचे प्रमाण कमी असते असे काही मीडिया रिपोर्ट्स सांगतात. त्यामुळे आता उमेदवारांच्या मागचे टेन्शन गेले आहे.
तसेच राज्य सरकारने अजून एक मोट आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
News - Rajy