देसाईगंज तालुक्यातील चोप कोरेगाव येथील युवतीच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : ब्रम्हपुरी येथील नवीन न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ६) पहाटे उघडकीस आली होती. युवतीच्या आत्महत्येप्रकरणी वडील मिलिंद लाडे यांनी सचिन शेंडे (३२) यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाची नोंद करून तपासाची चक्रे फिरवली.
न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वाराला गळफास घेऊन पौर्णिमा मिलिंद लाडे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीच्या आत्महत्येप्रकरणी वडील मिलिंद लाडे यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पौर्णिमाचे साक्षगंध सचिन शेंडे यांच्यासोबत झाले होते. मात्र, त्यानंतर सचिन शेंडे याने लग्नासाठी नकार दिला. लग्नासाठी नकार देत असल्याने तिने नैराश्यातून शेवटी आपली जीवनयात्रा संपवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सचिन गोवर्धन शेंडे (रा. कोंढाळा. ता. देसाईगंड जि. गडचिरोली) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र सचिन हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
News - Gadchiroli