महत्वाच्या बातम्या

 ब्रह्मपुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवपालखी सोहळा व प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन


- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदर्श लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ब्रम्हपुरी येथील छत्रपती फाउंडेशनच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.

ब्रम्हपूरी नगरीच्या इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने स्वराज्य वाद्य पथक चंद्रपुर यांच्या ढोलताशांच्या गजरात शिवपालखी सोहळ्याचे आयोजन दुपारी ३ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून नगरपरिषद पर्यंत करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिवराय ते भीमराय यावर आधारित प्रबोधनपर गीतांचा व पोवाडा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मी वादळवारा फेम, राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं फेम, सुप्रसिध्द गायिका कडुबाई खरात, सांगली येथील शिवशाहीर प्रबोधनकार सुरेश सुर्यवंशी, सिनेअभिनेत्री तथा सुप्रसिद्ध गायिका कोमल धांदे यांची उपस्थिती राहणार आहे.

या प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर अध्यक्षस्थानी काॅंग्रेसच्या अनुसूचित जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अॅड.रामभाऊ मेश्राम, माजी नगराध्यक्षा रिता उराडे, माजी न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, जि.प. माजी सभापती डॉ.राजेश कांबळे, जि.प.माजी सदस्य प्रमोद चिमुरकर, नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, ओबीसी विचारवंत भाऊराव राऊत, रयत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा.राकेश तलमले, मराठा सेवा संघाचे खेमराज तिवाडे, मिसार ज्वेलर्सचे संचालक योगेश मिसार, माजी नगरसेवक सचिन राऊत, संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष रवि मेश्राम, शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अनुकूल शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे आयटी सेल प्रमुख लिलाधर वंजारी, इंजि.जयपाल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते निनाद गडे, राजेश पिलारे, विलास दुपारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटु पिलारे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos