निमोनिया हद्दपारासाठी सॉस मोहीम : पालकांनी बालकांचे लसीकरण करावे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बालअवस्थेतील निमोनिया आजाराचे व्यवस्थापन करुन निमोनियाने होणारे आजार कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सॉस मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे. सध्या भारतात दरवर्षी निमोनियामूळे मोठया प्रमाणात बाल मृत्यु होत असतात. त्याचे प्रमाणे २०२५ पर्यंत दर हजारी तीनपेक्षा कमी करावयाचे आहे. निमोनिया हा आजार फुफुसांना तिव्र स्वरुपात होणारा, तसेच नेहमी दिसून येणारा सर्व सामान्य संसर्ग आहे, हा संसर्ग बहूतांशी विषाणू किंवा जीवाणू मुळे होतो. हा संसर्ग झालेल्या बालकांना खोकला येणे, श्वासोश्वास वेगाने होणे, छाती आत ओढणे, ताप येणे अशी लक्षणे असतात.
अशी लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच लहान बालकांना ६ महिने निव्वळ स्तनपान करावे, निमोनिया आजार टाळण्यासाठी आपल्या बाळाचे ठराविक वयोगटात (पहिला डोज ६ आठवडयात, दुसरा १४ आठवडयात, बुस्टर डोज ९ व्या महिन्यात) न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन घेतले आहे काय याची खात्री करावी. बाळाचे आरोग्य केन्द्रात जाऊन संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. या मोहिमेत आशा घरोघरी जाऊन समुपदेशन करणार आहे, त्यावेळी त्या निमोनिया नाही तर बालपन योग्य या घोषवाक्याचा वापर करणार आहे, तरी सर्व नागरीकांनी सहकार्य करावे व शंभर टक्के निमोनिया आजारावर प्रतिबंध करुन वेळेत उपचार करावा व निमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीचा समज दूर करुन व्यापक प्रमाणात प्रतिबंधासाठी जनजागृती करावी, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Nagpur