२ एप्रिलला विधी सीईटी होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : विधी पाच वर्षे या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यास क्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा 2 एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट केले.
सीईटी सेलच्या वेबसाईटवर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 11 मार्चपर्यंत उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज निश्चिती करता येणार आहे.
News - Rajy