महत्वाच्या बातम्या

 दुर्गा मातेच्या आशीर्वादानेच मिळाली जनसेवेची संधी : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / ब्रह्मपुरी : जिल्हा खनिज विकास निधी व खासदार स्थानिक विकास निधी मधून बांधकाम करण्यात आलेल्या मॉं दुर्गा मंदिर सामाजिक सभागृह उभारून यातून होऊ घातलेली जनसेवा करण्याची संधी मला दुर्गामातेनेच दिली. व या सभागृहात विविध समाज उपयोगी कार्य पार पडेल अशी आशा व्यक्त करून सदर मंदिराचा संपूर्ण परिसर आगामी काळात देखणा करू असे प्रतिपादन विधान सभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते मुल येथे दुर्गा माता मंदिर परिसरातील सभागृहा लोकार्पण सोहळा प्रसंगी उद्घाटन म्हणून बोलत होते.        

आयोजित लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रमुख अतिथी गडचिरोली माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. नामदेव किरसान, ज्येष्ठ कार्यकर्ते हसन जिलानी, प्राचार्य देविदास जगनाडे, कृषी उत्पन्न बाजार सभापती राकेश रत्नावार, सिदेंवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, माजी नगरसेवक नंदुजी नागरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, सा.बां.उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, माजी महापौर वसंता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर मंदिरात सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे. अशी विनंती ना. विजय वडेट्टीवार यांना केली असता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्यानेच हे सभागृह साकारल्याचे मत मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती राकेश रत्नावार यांनी मंदिर बांधत असताना अनेक अडचणी आल्या परंतु मातेच्या आशीर्वादाने व विजय वडेट्टीवार यांच्या सहकार्याने अडचणी दूर झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मंदिर समितीचे सदस्य गुरु गुरनुले यांनी मानले. कार्यक्रमानंतर ना. विजय वडेट्टीवार यांचे हस्ते मुल तालुका कांग्रेस, महिला काँग्रेसच्या वतीने नियुक्त केलेल्या सर्व सेलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव यांना नियुक्ती पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos