महत्वाच्या बातम्या

 एलसीबीच्या सापळ्यात सराईत चोर जेरबंद : दोन दुचाकी चोरी व घरफोडीचे तीन गुन्हे उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे राबविलेल्या विशेष मोहिमेत एका सराईत चोरट्याला अटक करून रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मोटारसायकल चोरी आणि एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गोपाल जीवन मालाकर (२६), रा. शामनगर, चंद्रपूर असे आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रामनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दोन दुचाकी चोरी आणि एका घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकली क्रमांक एमएच-३४ एएस-५०३५ व एमएच-३१ बीजे-३६२८ तसेच घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीने रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ६५०/२०२६ व ६७२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार नोंद असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची तसेच अपराध क्रमांक ६५१/२०२६ अंतर्गत कलम ३०५ व ३३१(४) नुसार दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे या तिन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान तसेच पोलीस अंमलदार किशोर वाकाटे, शशांक बदामवार आणि हिरालाल गुप्ता यांनी केले.

अटक आरोपीला पुढील तपासासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचा इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग आहे का याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos