महत्वाच्या बातम्या

 अखेर रत्नापूर ग्रामपंचायतला मिळाले स्वतंत्र ग्रामसेवक


- चार वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गावकरी यांच्या मागणीला मिळाले यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सन २०१८ पासून सिंदेवाही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या रत्नापूर गावाचा कारभार पाहण्यासाठी प्रभारी ग्रामसेवक कार्यरत होते. परंतु नुकतेच येथे स्वतंत्र ग्रामसेवक म्हणून नरेंद्र वाघमारे रुजु झाले आणी आपला कार्यभार चालु केले. त्यामुळे गाव विकासाचे दृष्टीने व गावातील जनतेच्या कामाचे दृष्टीने सुलभता मिळाली आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर पासुन १० कि.मी. अंतरावरील सरांडी ०७ कि.मी. खांडला ०५ कि.मी. पुरकेपार व ०३ कि.मी. इंदीरानगर मिळुन येथे १५ सदस्याचे गट ग्रामपंचायत आहे. सर्व गाव मिळुन जवळपास ७ ते ८ हजाराच्या घरात लोकसंख्या आहे. गावातील ग्रामसेवक म्हणजे शासन आणी गावातील जनता याचा दुवा आहे. गावातील जनतेचे व गाव विकासाचे काम करायचे असेल तर हे पद स्वतंत्रपणे असणे आवश्यक आहे. सन २०१८ या वर्षापर्यंत येथे कार्यरत असणारे ग्राम विकास अधीकारी बोपनवार यांना शासनाने येथुन तडकाफडकी निलंबीत करून पाठवले तेव्हापासून तर आजपर्यंत जवळपास ४ वर्षापर्यंतचे येथील कारभार प्रभारी ग्रामसेवकाचे भरोश्यावर सुरु होता. बोपनवार गेल्यानंतर शिवणी येथील ग्रामसेवक यांच्याकडे दीड दोन वर्ष होते. त्यांच्या नंतर मोहाळी येथील घुगुसकर यांच्याकडे होते. पुन्हा त्यानंतर मीनघरी लाडबोरी येथील ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांच्याकडे होते. असे ४ वर्ष निघुन गेले. त्यामुळे स्वतंत्र ग्रामसेवक मीळावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी यांच्याकडुन वारंवार मागणी करण्यात आली. पंरतु ती मागणी मान्य होत नव्हती. अखेर ४ वर्षानंतर त्या मागणीला यश आले, असुन आता नुकतेच स्वंतत्र ग्रामसेवक रत्नापूर ग्रामपंचायतला म्हणून नरेंद्र वाघमारे रुजु झाले आणी त्यांनी कारभार स्वीकारून कामाला सुरवात केलेली आहे. रत्नापूर ग्रामपंचायतला ग्रामविकास अधीकारी हे पद आहे. पंरतु ग्रामसेवक या ठीकानी रुजु झालेत. हे विशेष तरी पण गावकरी जनतेनी समाधान व्यक्त केलेले आहे.

ग्रामपंचायत म्हटल की, गाव विकास व गावकरी जनतेसाठी नेहमी कामाचे असणारे ठीकान आणी तेथील मुख्य ग्रामसेवक यांच्याकडे जनतेला पडणारे काम प्रभारी ग्रामसेवक हे हप्त्यातुन दोन दिवस देत असत त्यामुळे जनतेची दाखले प्रमाणपत्र घेण्याचे काम वेळेवर होत नव्हते. आणी त्यांना मानसीक, शारीरीक त्रास सहन करावा लागत होता. आणी गाव विकासाचे बाबतीतही बरीच निर्णय घेतांना अडचनीचा सामना करावा लागत होता. आता स्वतंत्र ग्रामसेवक रुजु झाल्याने पूर्ण दिवस हे हजर राहणार. आणी त्यामुळे गावातील जनतेची कामे वेळेवर होण्यास मदत होवून गाव विकासाचे कामे देखील मोठ्या प्रमाणात गती घेऊन गाव विकास साधला जाईल आणी कोणत्याही विकास कामात अडचन येणार नाही, असे जनतेत बोलल्या जात आहे. नव्यानेच रुजु झालेले ग्रामसेवक यांनी सर्व जनतेच्या कामासह गाव विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशीर राहुन कामे करावी, अशी अपेक्षा रत्नापूरवासीय जनता बाळगून आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos