पुरामुळे कोठी येथील मोबाईल टाॅवरची यंत्रसामुग्री निकामी, १८ दिवसांपासून टाॅवर बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्याला तब्बल सातवेळा पुराने वेढले होते. यामुळे अनेक शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोठी गावालासुध्दा पाण्याने वेढले होते. यामुळे पोलिस मदत केंद्राच्या परिसरात असलेल्या मोबाईल टाॅवरची यंत्रसामुग्री निकामी झाली आहे. 
टाॅवरची संपूर्ण यंत्रणा पाण्यात सापडल्यामुळे खराब झाली आहे. यामुळे मागील १८ दिवसांपासून नेटवर्क नाही. यामुळे भ्रमणध्वनीधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. टाॅवर बंद पडल्याबाबत सबंधित विभागाला कळविण्यात आले असून आयटी विभागाला कळविण्यात आल्याची माहिती सबंधित विभागाने दिली आहे. लवकरच यंत्रसामुग्रीची दुरूस्ती करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-23


Related Photos