महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१० जानेवारी महत्वाच्या घटना

१६६६ : सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.

१७३० : पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

१८०६ : केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

१८१० : नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.

१८५३ : चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

१८७० : मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.

१८७० : जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली

१९२० : पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

१९२६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले

१९२९ : जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.

१९६६ : भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

१९७२ : पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.

१० जानेवारी जन्म

१७७५ : बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)

१८९६ : वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)

१९०० : महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

१९०१ : इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.

१९१९ : संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.

१९२७ : तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.

१९४० : पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.

१९५० : आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.

१९७४ : हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.

१० जानेवारी मृत्यू

१७६० : पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.

१७७८ : स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन. (जन्म: २३ मे १७०७)

१९९९ : स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.

२००२ : ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos