महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनासह विविध अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याच्या समारोपासह दोन राज्यस्तरीय उपक्रमांचा शुभारंभ व नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग, खा. रामदास तडस, आ. नागोराव गाणार, आ. रामदास आंबटकर, आ. अभिजित वंजारी, आ. रणजित काबंळे, आ. दादाराव केचे, आ. समिर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, महसूलचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित राहणार आहे.

यावेळी मान्यवरांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचे उद्घाटन होईल. जिल्हा क्रिडा संकुल येथे सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रमात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा समारोप, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 नद्याच्या परीक्रमेचा शुभारंभ व हॅलो ऐवजी वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ होईल.

लोकप्रिय शाहीर व गायक नंदेश उमप व सुप्रसिध्द गायिका बेला शेंडे यांच्या गीत व भजन गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

  Print


News - Wardha
Related Photos