मतदानाच्या दिवशी भंडारा जिल्ह्यात कोरडा दिवस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १६५ (C) अन्वये जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्ती मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी मतदान व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिट याचिका क्र. ८९६०/२०२६ अन्वये कोरड्या दिवसाचा आदेश केवळ २३ ऑक्टोबर २०२६ या मतदानाच्या दिवसापुरता मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.




Petrol Price




