मंजीत मंडल याची दक्षिण आशिया कराटे स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
ऑल इंडिया ओपन एन.एस.के.ए.आय. कराटे स्पर्धा जळगाव येथे पार पडली. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथील विद्यार्थी मंजीत अजित मंडल याने सुवर्ण पदक पटकाविले. यामुळे त्याची दिल्ली येथे होत असलेल्या दक्षिण आशिया कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
मंजीत मंडल हा बी.एस.सी. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. तो तालुक्यातील दुर्गम भागातील अडपल्ली गावातील रहिवासी आहे. मंजीत मंडल याने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे उपाध्यक्ष बबलु हकीम, प्राचार्य डाॅ. रंजीत मंडल, क्रीडा प्रमुख डाॅ. मनोहर कलोडे यांना दिले आहे. त्याच्या निवडीबद्दल डाॅ. प्रसाद, डाॅ. शनवारे, डाॅ. बाचेर, प्रा. शेंडे, प्रा. वाणी, प्रा. सुनतकर, प्रा. गावडे व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-02


Related Photos