महत्वाच्या बातम्या

 डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / चेन्नई : अभिनेता ते राजकारणी विजयकांत यांचे आज गुरुवारी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने चेन्नईतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

डीएमडीके पक्षाचे संस्थापक विजयकांत (७१ वर्षे) यांना चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

DMDK ची स्थापना २००५ मध्ये झाली -

- अभिनेता विजयकांतने २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम पार्टीची स्थापना केली. DMDK २०११ ते २०१६ पर्यंत तामिळनाडूमध्ये मुख्य विरोधी पक्ष होता आणि विजयकांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.

- २००६ मध्ये विजयकांत यांच्या पक्ष डीएमडीकेने तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र विजयकांत एकटेच निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. उर्वरित सर्व जागांवर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ८.३८% मते मिळाली.

- अशीच परिस्थिती २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयकांत यांच्या पक्षासोबत घडली होती, जेव्हा पक्षाने राज्यातील ४० पैकी ३९ लोकसभा जागा लढवल्या होत्या, परंतु एकही जागा जिंकली नव्हती. या दोन्ही निवडणुकांमध्ये विजयकांत यांच्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही.

- २०११ मध्ये विजयकांत यांच्या पक्षाने ४१ जागांवर निवडणूक लढवली आणि २९ जागा जिंकल्या. या निवडणुकीत डीएमडीके हा जयललिता यांच्या पक्षानंतर (एआयएडीएमके) दुसरा पक्ष म्हणून उदयास आला, विजयकांत विरोधी पक्षनेते बनले. मात्र, त्यानंतर २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्याचप्रमाणे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डीएमडीकेला एकही जागा जिंकता आली नाही.





  Print






News - World




Related Photos