महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : ३ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य व राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा २०२३-२४ चे औचित्य साधुन २८ व २९ डिसेंबर २०२३ रोजी समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद भंडारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा, यांचे जिल्हयातील शासकीय अनुदानित व कायम विना अनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सन २०२३-२४ या वर्षात जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा, छत्रपती शिवाजी जिल्हा क्रिडा संकुल भंडारा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

दिव्यांगाना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा मनीषा कुरसंगे यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos