युवकांच्या शारीरिक व्यायामाबरोबरच तंदुरुस्त सुदृढ शरीर राहण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक : खासदार अशोक नेते
- नमो चषक- २०२४ खासदार चषक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शाखा- गडचिरोली यांच्या वतीने भव्य रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : युवकांच्या शारिरीक विकासाला चालना मिळावी. यासाठी नमो चषक-२०२४ / खासदार चषकांचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा शाखा-गडचिरोली यांच्या वतीने भव्य रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट नमो चषक- २०२४ / खासदार चषक जिल्हा प्रेक्षागार मैदान (जिल्हा स्टेडियम) पोटेगांव रोड गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले.
या नमो चषक-२०२४ क्रिकेट टूर्नामेंट च्या उदघाटनाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना युवकांच्या शारिरीक विकासाला चालना मिळावी. यासाठी आजच्या युगामध्ये अनेक युवा वर्ग, युवा पिढी हे मोबाईलच्या गेम कडे व मोबाईल कडे वळून व्यस्त झाली आहे. त्यामुळे युवकांमध्ये शारीरिक श्रम व शारीरिक हालचाली हे कमी होतांना दिसत आहे. शारीरिक दृष्ट्या फिटनेस साठी तंदुरुस्तीसाठी युवकांनी खेळ खेळले पाहिजे. याकरिता युवकांसाठी खेळाचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. करिता नमो चषक- २०२४ चे आयोजन करण्यात आले. खेळ खेळल्याने शरीराचे व्यायामाबरोबरच तंदुरुस्त सुदृढ शरीर राहण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे.
क्रिकेट या खेळात पंचाची महत्वाची भूमिका असते. यासाठी पंचाचा निर्णय अंतिम माणूनच वादविवाद न करता खेळ खेळावे, असे प्रतिपादन या नमो चषकाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी हातात बँट घेऊन खेळण्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुकतेने मैदानात उतरून खेळ खेळला. नमो चषकाच्या लोगोचा अनावरण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्याचे अनेक युवा खेळाडू इतर राज्यांत टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊन पुरस्कार प्राप्त केलेले आहे. त्यांचा सुद्धा यावेळी अभिनंदन करण्यात आले.
प्रथम पुरस्कार व द्वितीय पुरस्कार संयुक्तपणे - खासदार अशोक नेते यांचे कडून २ लक्ष रूपये, १ लक्ष रूपये
तृतीय पुरस्कार - स्व. वामनराव देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रवीण वामनराव देशमुख यांच्याकडून २५ हजार रुपये
चतुर्थ पुरस्कार - सावकार टीव्हीएस शोरूम यांच्याकडून २५ हजार रुपये
तसेच विजेत्यां संघाना ट्रॉफी बक्षिसाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने मंचावर या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ट नेते तथा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, ज्येष्ठ नेते नामदेवराव शेंडे, माजी नगर परिषदचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी जि.प. अध्यक्ष सोमया पसुला, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, आयोजक पवन गेडाम, सचिन मडावी, सुरज वैरागडे, आर्यन वरगंटीवार, साहील बारापात्रे तसेच मोठ्या संख्येने भाजपा युवा पदाधिकारी व कार्यकर्ते व क्रिकेट बंधू युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli