महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व मत्स्यव्यवसायांचे उत्पन्न वाढीस मदत : खा. रामदास तडस


- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत रिवर रॉन्चींग प्रोग्राम सन २०२३-२४ अन्वये भारतीय प्रमुख कार्प मत्स्यबोटूकली संचयन कार्यक्रम संपन्न.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (पुलगांव) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना शेती करून चांगले जीवन जगता यावे. यासाठी केन्द्रसरकार व राज्यसकार प्रयत्न करीत आहे, केंद्र लोकप्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आणि मच्छिमार यांच्या जीवनात बदल करण्याच्या दृष्टीकोनातुन मत्स्य व्यवसायासाठी केंद्र सरकार व्दारा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २०२० सुरु केली आहे. मत्स्यपालन हे आता असेच एक क्षेत्र आहे. ज्यात प्रचंड क्षमता आहे. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. जलाशय, तलाव, शेततलाव या मध्ये पारंपरिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय केले जाते. आहे. परंतु ते प्रमाण म्हणावे तेवढे वाढले नाही. ते वाढवल्यास शेतकऱ्यांचा मत्स्य व्यवसाय व्यवसाय विकसित होऊ शकतो. मत्स्यव्यवसायाला फायदेशीर करण्यासाठी चांगल्या प्रतीचे मत्स्यबोटूकली संचयन करणे आवश्यक असते. याची गरज लक्षात घेता याकडे व्यवसायिक संधी म्हणून शेतकऱ्यांनी बघितल्यास शेत तलाव व बोड्याचा वापर मत्स्यबीज संगोपणासाठी करता येऊ शकतो, या माध्यमातुन शेतकऱ्यांचे व मत्स्यव्यवसायांचे उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते, असे प्रतिपादन यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.

वर्धा नदी पात्रात मौजा-गुजंखेडा ता. देवळी जि. वर्धा येथे मत्स्यव्यवसाय विभाग वर्धा व्दारा आयोजित प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत रिवर रॉन्चींग प्रोग्राम सन २०२३- २४ अन्वये भारतीय प्रमुख कार्प मत्स्यबोटूकली संचयन कार्यक्रम वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला मनोरंजन मत्स्य.सह. संस्था आर्वीचे अध्यक्ष शरद करलुके, नारायण मत्स्य.सह. संस्था विरुळचे सचिव सुभाष पारीसे, मत्स्यव्यवसाय वर्धा चे सहाय्यक आयुक्त पदमाकर बसवंत, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रुचा कंधारे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्तावीक सहाय्यक आयुक्त पदमाकर बसवंत यांनी केले. मत्स्यव्यसाय बाबत सरकारच्या योजना, मत्स्यबोटूकली संचयन याबाबत माहिती दिली. संचालन दिनेश खोपे यांनी केले उपस्थितांचे आभार रुचा कंधारे यांनी मानले, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, कर्मचारी, मत्स्य.सह. संस्थाचे सदस्य व मच्छिमार बांधव मोठया संख्ये उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos