अहेरी उपविभागात संततधार पावसाने अनेक नदी, नाल्यांना पुर, जनजिवन विस्कळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
मागील २४ तासापासून  संततधार सुरु असलेल्या पावसामुळे अहेरी उपविभागातील बहुतांश नाल्याना पुर आला आहे. भामरागड जवळील पर्लकोटा नदिला पूर आल्याने भामरागड चा संपर्क पुर्णपणे तुटला आहे. भामरागड - आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. तसेच अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्याला पूर आल्याने बारा गावाचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. लोकांना जिवनावश्क वस्तू मीळने कठीण झाले आहे.ठेंगणा पुल असल्याने थोडा जरी पाऊस आला तर हा नाला बंद होत असतो. तसेच अहेरी जवळचा लक्ष्मन नाला भरुन वाहत आहे. त्यामुळे अहेरी आलापल्ली रस्ता कधीही बंद होऊ शकते. तानबोडी नाला, दिना नदी व चौडमपल्ली येथील नाल्यावर पावसाचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. 
  संततधार येत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवडी बाजार,गुजरी भरली नाही. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला मिळाला नाही. तसेच गावातील सांडपाण्याच्या नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने व रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे असल्याने जणतेला मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे. खड्यात पाणी तुडंब भरल्याने अपघाताचे धोके निर्माण झाले आहे. मागील चार दिवसापासून होत असलेल्या  पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी मानव निर्मित काही समस्यांमुळे जनतेचे हाल होत आहे.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-07-29






Related Photos