महत्वाच्या बातम्या

 दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३.५३ लाख कोटींचे विक्रमी करार : २ लाख रोजगार निर्मिती होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : स्वीत्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने दोन दिवसांत ३ लाख १० हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार केले. गुरुवारी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशारीतीने ३.५३ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करण्यात येत आहेत.

१ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यात २ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी समाज माध्यमांतून सांगितले.

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. उद्या ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.





  Print






News - Rajy




Related Photos