महत्वाच्या बातम्या

 कोविड मॉकड्रीलच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : परदेशात कोविडची वाढती रुग्णसंख्या पाहता दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल श्रीपती मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यासह सर्व आरोग्य यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये आजपासून कोविड अनुषंगीक वैद्यकीय सेवा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी व मॉकड्रील होणार आहे. भविष्यात कोविडचे रुग्ण वाढल्यास खबरदारी म्हणून या सर्व सेवा सुविधा अद्यावत करण्यात येणार आहे. यानुसार कोविडच्या डॅशबोर्ड वरती कोविडच्या अनुषंगाने त्या जिल्ह्यात अद्यावत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती पुन्हा अपलोड करायची आहे. सद्या जिल्ह्यात कोविड तपासण्या सुरू असून शून्य रुग्णांची नोंद आहे. मात्र संशयित रुग्णांनी त्याची आरोग्य तपासणी तातडीने करून घ्यावी.

सध्या जिल्ह्यात कोविडची सक्रिय रुग्णसंख्या नसली तरी देखील वाढता धोका पाहता सर्व आरोग्य व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे व रोजचे दैनंदिन रिपोर्टिंग करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या.





  Print






News - Bhandara




Related Photos