सक्षम राजकीय नेतृत्वाअभावी गडचिरोली जिल्हा विकासात मागे : आ. कपील पाटील


- लोकभारतीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. राजेश कात्रटवार यांची नियुक्ती
- आ. कपील पाटील यांनी विविध मुद्द्यांवर टाकला प्रकाश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात रेल्वे, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, नक्षलवाद अशा असंख्य समस्या आहेत. यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. मात्र जिल्ह्याच्या दुरवस्थेला प्रस्थापित लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. जिल्हा निर्मितीपासून जिल्ह्याला सक्षम राजकीय नेतृत्व मिळालेले नाही आणि सरकार विकासासाठी काहीही करीत नाही. यामुळे जिल्हा विकासात मागे पडला. यामुळे लोकभारती पक्ष जिल्ह्यात राजकीय पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, असे शिक्षक आमदार कपील पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी प्रा. राजेश कात्रटवार यांची लोकभारतीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.
आज २० जुलै रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ. कपील पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेला लोकभारती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश कात्रटवार, प्रा. संजय खेडीकर, भाउराव पत्रे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, जिल्ह्यात अद्यापही रेल्वेची कनेक्टीव्हीटी नाही. बेरोजगारीचा प्रश्न आहे. मागील अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाणाचा प्रश्न आहे. मोठ्या संख्येने ओबीसी समाज असतानाही केवळ ६ टक्के आरक्षण आहे. केवळ तेंदुपत्ता हेच विकासाचे साधन म्हणून शासन इतर बाबींकडे दूर्लक्ष करीत आहे. नक्षलवादाच्या दृष्टीने जिल्ह्याकडे पाहिले जाते. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य याकडे दूर्लक्ष केले जात आहे. सरकारी नोकरी, शिक्षण आदीमध्ये आदिवासींचा वाटा नगण्य आहे.  नक्षलवाद रोखण्यासाठी शासन करोडो रूपये खर्च करीत आहे. मात्र हाच खर्च रोजगार निर्मितीवर केल्यास बेरोजगारी मिटेल, शोषण, विषमता संपविल्यास नक्षलवादही मिटेल,  असेही आ. पाटील म्हणाले. 

विधानसभा निवडणूकीत पुरोगामी शक्तींना एकत्र करू

जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत  लढण्यासाठी पुरोगामी शक्तींना एकत्र करू. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी येत्या काही दिवसात तो निर्णय घेतील. विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात वंचित बहुजन आघाडीसह इतरही पक्षांना काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसला नम्रपणे स्वीकारावे लागेल. काॅंग्रेस, राकाॅ भ्रमात राहिल तर भाजपा त्यांना संपवून टाकेल, असेही आ. कपील पाटील म्हणाले.  

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-20


Related Photos