महत्वाच्या बातम्या

 खासदार अशोक नेते यांनी दिलेला शब्द पाळला : सततच्या पाठपुराव्याला यश


- अखेर मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम येत्या १ मार्च २०२४ ला खासदार अशोक नेते यांच्या हस्ते विधीवत पुजन करून सुरु करणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम अखेर येणाऱ्या १ मार्च ला नव्या जोमाने पुन्हा सुरू होणार आहे. चार दिवसांपूर्वीच खासदार अशोक नेते यांनी हे काम येत्या १५ दिवसात मार्गी लागून सुरू होईल, अशी ग्वाही दिली होती. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धार कामातील अडचणी खा. नेते यांनी वारंवार दिल्लीत पाठपुरावा करून दूर करत अखेर हे काम मार्गी लावले. याचे वृत्त आल्याचे गडचिरोलीसह जिल्हाभरात आनंद व्यक्त केला जात आहे.

हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे यासाठी खा. नेते दोन वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वीच या कामातील प्रशासकीय अडचणीही दूर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुरातत्व विभागाने मटेरियल टेंडरचे कामही पूर्ण केले होते. आता वित्त विभागाकडून पुढील कामासाठी मंजुरी मिळाल्याने लेबर टेंडरचेही काम मार्गी लागल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी खा. अशोक नेते यांना कळविले.

गेल्या शुक्रवारी मार्कंडा परिसरातील नागरिकांनी व सुनील शास्त्री महाराज, मुरलीधर महाराज यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन हे काम कधी सुरू होणार, असा सवाल जिल्हा प्रशासनाला केला होता. त्यावेळी खा. नेते यांनी दिल्ली येथील आँल इंडिया पुरातत्व विभागाने महानिदेशक यांना जिल्हाधिकारी कार्यालयीन कक्षात दूरध्वनीवरून सांगीतल्याप्रमाणे येत्या पंधरा दिवसात काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले असतांना यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची सद्यस्थिती सर्वांना सांगितली होती. याशिवाय नागरिकांसमोरच पुरातत्व विभागाच्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोबाईलवरून संपर्क केल्यानुसार त्यांनी या कामातील सर्व अडचणी आता दूर झालेल्या असून १५ दिवसात हे काम सुरू करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार खा.नेते आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या वतीने गावकऱ्यांना हे काम १५ दिवसात सुरू करण्याचा शब्द दिला होता. खासदारांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.

मार्कंडेश्वर मंदिराचे काम भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमानुसार करावे लागत असल्यामुळे त्यांच्या स्तरावर काही प्रशासकीय अडचणी होत्या. पण त्या सर्व अडचणी दूर करून हे रखडलेले काम कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या महाशिवरात्रीपूर्वी सुरू करावे, अशी सूचना मी केली होती आणि त्यासाठी अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर त्याला यश आल्याचे समाधान आहे. १ मार्चला मंदिरात रितसर पुजा करून या कामाची नव्याने सुरूवात करणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना हेसुद्धा उपस्थित राहतील.





  Print






News - Gadchiroli




Related Photos