शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरकारी अनुदानित महापालिका, परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाच्या सर्व सरकारी अनुदानित महापालिका, परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना लाभ देण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती ट्वीट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझ्याकडे असलेल्या शिक्षण विभागाला शासनाच्या सर्व सरकारी अनुदानित महापालिका, परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना लाभ देण्यासाठी सातव्या व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
News - Rajy | Posted : 2019-07-04